#Prokabaddi2019 : गुजरातपुढे बंगालचे आव्हान

गुजरात फॉर्च्युनजाएंट्‌स विरूध्द बंगाल वॉरियर्स
स्थळ – अहमदाबाद
वेळ – रात्री 8.30 वा.

अहमदाबाद – प्रो कबड्डीमध्ये आज पहिल्या सामन्यात बंगळुरू बुल्स संघाला पराभवाचा धक्‍का देणाऱ्या यु पी योद्धापुढे हरयाणा स्टीलर्स संघाची आज कसोटी ठरणार आहे. दुसरीकडे अन्य लढतीत गुजरात फॉर्च्युनजाएंट्‌सला बंगाल वॉरियर्सच्या आव्हानास तोंड द्यावे लागणार आहे. हे दोन्ही सामने रंगतदार होतील अशी अपेक्षा आहे.

गुजरातला घरच्या मैदानावर अपेक्षेइतका प्रभाव दाखविता आलेला नाही. चढाया व पकडींवर नियंत्रण ठेवण्यात ते कमी पडले आहेत. त्याचप्रमाणे सांघिक कौशल्यातही त्यांना खूप सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे.

बंगाल संघासही खेळाडूंमधील समन्वय वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. शेवटपर्यंत जिद्दीने लढत देण्यावर त्यांनी लक्ष दिले पाहिजे.

गुजरात फॉर्च्युनजाएंट्‌स :

बलस्थाने-घरच्या वातावरणात खेळण्याचा फायदा, नियोजनपूर्वक खेळ.
कच्चे दुवे – चढाया व पकडींमध्ये अक्षम्य चुका, शेवटच्या क्षणी घिसाडघाई.

बंगाल वॉरियर्स :

बलस्थाने – अनुभवी खेळाडूंची मांदियाळी, पल्लेदार चढायांमध्ये माहीर.
कच्चे दुवे – सांघिक कौशल्याबाबत चुका, नियोजनबद्ध खेळाचा अभाव.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.