#ProKabaddi2019 : गुजरातचा बंगळुरूवर ‘जायंट’ विजय

हैदराबाद – गुजरातच्या संघाने बंगळुरूच्या संघावर आपल्या पहिल्याच सामन्यात एकतर्फी वर्चस्व गाजवत सामना 24 विरुद्ध 42 अशा फरकाने विजय मिळवत आगेकूच नोंदवली.

यावेळी झालेल्या सामन्यात गुजरात सुपर जायंट्‌सच्या संघाने सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवायला सुरूवात केली. त्यांनी बंगळुरूच्या पवन शेरावत आणि रोहित कुमारच्या विरोधात रणनिती आखत त्यांना बांधून ठेवले. त्यामुळे संपुर्ण सामन्यात त्यांना सुर गवसलाच नाही. त्याचाच फायदा उचलत गुजरातच्या बचावपटूंनी बंगळुरूच्या रेडर्सना फारच कमी वेला यशस्वी होवू दिले. त्यामुळे सामन्यात बंगळुरूच्या संघाला पुनरागमनाच्या फार कमी संधी मिळाल्या.

यावेळी गुजरातच्या पवन शेरावतने सर्वाधीक 8 पॉइंट्‌स मिळवत गुजरातच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर, सुनिल कुमारने पाच जणांना बाद करत त्याला सुरेख साथ दिली. पवन आणि सुनिल सोबतच सचिन, जी.बी मोरे आणि सोनू यांनी सुरेख खेळ करत गुजरातला विजय मिळवून दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)