गुजरात फॉर्च्युनजाएंट्स विरूध्द तेलुगु टायटन्स
स्थळ – अहमदाबाद
वेळ – रात्री 8-30 वा.
अहमदाबाद – अनुभवी खेळाडूंचा समावेश असूनही तेलुगु टायटन्सला प्रो कबड्डी लीगमध्ये अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. आज त्यांना पहिला विजय मिळविण्यासाठी गुजरात फॉर्च्युनजाएंट्स संघाच्या आव्हानास तोंड द्यावे लागणार आहे.
एकाएरिना ट्रान्सस्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत तेलुगु संघाची निराशाजनक कामगिरी हाच चर्चेचा विषय झाला आहे. चढाया व पकडी या दोन्ही आघाड्यांवर त्यांना अपेक्षेइतकी अव्वल दर्जाची कामगिरी करता आलेली नाही. त्यांच्या खेळात आत्मविश्वास व सांघिक कौशल्याचा अभावच दिसून आला आहे. त्यांच्या तुलनेत गुजरात संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्यांचे खेळाडू खोलवर चढाया करण्यात माहीर आहेत. तसेच पकडींमध्येही त्यांच्याकडे अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे.
गुजरात फॉर्च्युनजाएंट्स :
बलस्थाने – सातत्यपूर्ण कामगिरी, घरच्या वातावरणात खेळण्याचा लाभ.
कच्चे दुवे – पकडींमध्ये नकळत चुका.
तेलुगु टायटन्स :
बलस्थाने – अनुभवी खेळाडूंची मांदियाळी, खोलवर चढाया करण्यात पटाईत.
कच्चे दुवे – शेवटच्या क्षणी अक्षम्य चुका.