मुंबई – गुजरात निवडणुकांमुळे भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजा सध्या चांगलाच चर्चेत आहे. जडेजाची पत्नी रिवाबा विधानसभेच्या मैदानात उतरली असून जडेजा देखील प्रचारात व्यस्त आहे. गुजरामधील या निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. मतदानाच्या काही तासांपूर्वी रवींद्र जडेजाने हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
गुजरातमध्ये भाजप,आप आणि काँग्रेस अशी लढत पाहायला मिळणार आहे. गुजरातमधील आपच्या एंट्रीने निवडणुक चुरशीची होणार आहे. जडेजाने बाळासाहेबांचा व्हिडीओ पोस्ट करत एक सूचक कॅप्शन दिले आहे, या व्हिडिओमध्ये बाळासाहेब नरेंद्र मोदींच कौतुक करताना दिसत आहेत. ‘मोदी गया तो गुजरात गया’ अस बाळासाहेब या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. त्यावर जडेजाने अजूनही वेळ आहे समजून घ्या गुजरात्यांनो असं आव्हान केलं आहे.
Abhi bhi time hai samaj jao gujaratiyo🙏🏻 #respect #balasahebthackeray pic.twitter.com/bwjO3Jj7iq
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 30, 2022
जामनगरमधून जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा विरुद्ध बहीण आणि काँग्रेस आघाडीच्या नेत्या नैनाब जडेजा अशी फाईट पाहायला मिळणार आहे. या मतदार संघावर जडेजा कुटुंबाचे वर्चस्व आहे. त्यामुळे जामनगरचा निकाल काय लागणार याकडे अवघ्या गुजरातचे लक्ष लागून आहे.