गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची करोना टेस्ट

अहमदाबाद : गुजरातमधील कॉंग्रेस एका आमदाराला करोना संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचीही करोना टेस्ट करण्यात आली आहे. सध्या त्यांना करोनाची कोणतीही लक्षणे अद्याप दर्शविली नाहीत. परंतु खबरदारी म्हणून त्यांना घरीच स्वत:ला होम क्‍वारंटाइन करून घेतले आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्रयांचे सचिव अश्‍विनी कुमार म्हणाले, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची प्रकृती एकद स्थीर आहे. डॉ. अतुल पटेल आणि डॉ. आर. के. पटेल यांनी आज त्यांची तपासणी केली. त्याचा अहवालही प्राप्त झाला असून रुपाणी यांच्यात करोनाची कोणतीही लक्षणे आढळून आले नाहीत. परंतु सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून कोणत्याही रहिवाशाला त्यांच्या निवासस्थानी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मंगळवारी एक बैठक आयोजित केली होती. ज्यात कॉंग्रेसचे काही आमदार उपस्थित होते. यापैकी एका स्थानिक आमदाराला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच अहमदाबादमधील खाडिया-जमालपुर मतदारसंघाचे आमदार खेडावाला यांनाही रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. तेही या बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान, अहमदाबादमध्ये करोनाचे 53 नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या 373वर पोहोचली आहे. याशिवाय सुरतमध्ये नऊ, वडोदरामध्ये सहा, भावनगरमध्ये तीन, छोटा उदयपूर आणि मेहसाना येथे प्रत्येकी दोन आणि आनंद, दाहोद आणि गांधीनगर येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.