गुजरातमधील कोव्हिड सेंटरला भीषण आग, 12 जणांचा होरपळून मृत्यू

पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री घडली दुर्घटना

अहमदाबाद : गुजरातमधील भरुच येथील एका कोव्हिड रुग्णालयाला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री जवळपास 12.30 वाजता ही दुर्घटना घडली. सध्या ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, भरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयातील कोरोनाबाधितांसाठी कोव्हिड सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोव्हिड सेंटरमधील आयसीयूमध्ये शॉटसर्किट झाल्याने आग लागली. रात्री 12 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्ण हे गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 

शॉटसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
प्राथमिक माहितीनुसार, शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तसेच या आगीत जखमी झालेल्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण आयसीयू वॉर्ड यात जळून खाक झाला. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

जखमींवर उपचार सुरु
दरम्यान सध्या अग्निशमन दलाचे जवान, पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मात्र ही घटना नेमकी कधी घडली, आग कशी लागली, याची अजूनही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सद्यस्थितीत या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना सिविल, सेवाश्रम, जंबूसर अल मेहमूद रुग्णालयांसह इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.