अहमदाबाद – गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने बडोदा शहराच्या बाह्य भागातील एका उत्पादन युनिटवर छापा टाकून सुमारे 500 कोटी रुपयांच्या प्रतिबंधित एमडी ड्रगचा मोठा साठा जप्त केला आहे. (Gujarat ATS raids factory near Vadodara, recovers drugs worth ₹500 crore) या ड्रगमध्ये अंमलीपदार्थाचा वापर करण्यात आला होता.
औषधी गोळ्यांच्या नावाखाली थेट अंमलीपदार्थच विकण्याचा उद्योग तेथे सुरू होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पाच जणांनाही पथकाने ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, आरोपी कायदेशीररित्या रसायने तयार करण्याच्या नावाखाली एमडी ड्रग नावाचा अंमली पदार्थ बनवत होते. हे एक मोठे नेटवर्क असावे असा कयास आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. या संबंधातील अधिक तपशील दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिला नाही.
वाचाळवीरांना आवरा, मंत्री लोढांच्या वक्तव्यावरुन अजित पवार भडकले; म्हणाले ” हे कधी… “
दरम्यान, या वर्षी ऑगस्टमध्येच एटीएसने वडोदरा शहराजवळील दुसऱ्या एका गोदामातून सुमारे 1,000 कोटी रुपयांचे 200 किलो मादक पदार्थ जप्त केले होते.