गुजरात एटीएस, तटरक्षक दलाची पाकिस्तानी बोटीवर कारवाई; १०० किलो ड्रग्ज जप्त

गांधीनगर – गुजरातमधील पोरबंदरमध्ये गुजरातमधील दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि तटरक्षक दलाने ड्रग्ज माफियांवर आहे. सुमारे १०० किलो अमली पदार्थ असलेल्या एका पाकिस्तानी बोटीत ९ इराणी होते. एटीएस आणि तटरक्षक दलाला पाहून ड्रग्ज माफियांनी बोट स्फोटकांनी उडवून अमली पदार्थ नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याप्रकरणी गुजरात एटीएसने ९ जणांना अटक केली आहे.

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदर येथून ही बोट निघाली होती. हमिद मलिक या पाकिस्तानी नागरिकाने बोटीत तब्बल १०० किलो अमली पदार्थ ठेवले होते. या अमली पदार्थांची किंमत सुमारे ५०० कोटी रुपये इतकी होती. पाकिस्तानमधून सागरी मार्गाने भारतात अमली पदार्थ पाठवले जात असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती. गुजरात एटीएसने तटरक्षक दलाच्या मदतीने या बोटीवर कारवाई केली. या कारवाईमुळे अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांना मोठा हादरा बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.