अहमदाबाद – गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात उद्या सोमवारी मतदान होत आहे. मध्य आणि उत्तरेकडील 14 जिल्ह्यांतील विधानसभेच्या 93 जागांवर हे मतदान होणार आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या 91 पैकी 51 जागा जिंकल्या, कॉंग्रेसला 39, तर तीन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या होत्या.
या टप्प्यातील निवडणुकीसाठी विविध पक्षांनी सुरू केलेला हायव्होल्टेज प्रचार शनिवारी सायंकाळी संपला. सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरात विभागातील 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर रोजी झाले, तेव्हा सरासरी 63.31 टक्के मतदान झाले.गुजरात विधानसभेत एकूण 182 जागा आहेत. उद्या सायंकाळी पाच वाजता मतदान संपणार आहे. त्यानंतर विविध वाहिन्यावर एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर केले जातील. त्या विषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.