जामखेडच्या कृषीकन्या कडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जामखेड (प्रतिनिधी) – वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय उस्मानाबाद येथील चतुर्थ वर्षाची कृषिकन्या प्रियंका बबन राठोड हीने शेतकऱ्यांच्या विविध शेतीविषयक आधुनिक ॲप ची माहिती दिली.

किसान सुविधा, फुले कृषी दर्शनी, प्लांँटिक्स अशा ॲप विषयी माहिती दिली. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हवामानाचा अंदाज कसा करायचा याबाबत तांत्रिक माहिती दिली. यावेळी रंगनाथ राळेभात,दत्ता राळेभात, बबन राठोड, कृष्णा राळेभात आदी प्रतिष्ठित शेतकरी उपस्थित होते.

या कृषिकन्या ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अहिरे सर, कार्यक्रम समन्वयक डॉक्टर थोरात सर, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर तवले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.