चिंचवड स्टेशनवर “गाईडन्स डिस्प्ले बोर्ड’

आरक्षित डब्यांची माहिती कळणार ः पिंपरी स्टेशनवरही सुविधेची प्रवाशांची मागणी

“पुणे-एर्नाकुलम’च्या आरक्षणासाठी झुंबड

येत्या 15 एप्रिलपासून मुंबई, कोकणवासी, गोवा, कर्नाटक, केरळवासीयांसाठी पुणे-एर्नाकुलम पुणे हमसफर हॉलिडे विशेष संपूर्ण वातानुकूलित एक्‍सप्रेस गाडीला जाताना व येताना चिंचवड येथे थांबा मिळाला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षांची मागणी मार्गी लागली आहे. या मार्च महिन्यात चिंचवड येथील आरक्षण केंद्रातून सुमारे 40 हजार प्रवाशांनी तिकिटे आरक्षित केली आहेत. त्यापोटी रेल्वे विभागाला 2 कोटी 50 लाखांच्या जवळपास उत्पन्न मिळाले आहे.

चिंचवड – चिंचवड रेल्वे स्थानकावर “कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्ड’ बसविण्यास सुरूवात झाली आहे. येत्या सोमवारपासून चिंचवड स्टेशनच्या फलाट क्रमांक तीन (डाऊन) वर ही सुविधा सुरू होणार आहे. चिंचवडच्या फलाट क्रमांक दोनसह पिंपरी स्टेशनवरही “कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्ड’ची मागणी होत आहे. चिंचवड रेल्वे स्थानकात आजमितीला पुणे-मुंबई सिंहगड एक्‍सप्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍सप्रेस, नांदेड-पनवेल एक्‍सप्रेस, पुणे-इंदौर एक्‍सप्रेस, पुणे-ग्वाल्हेर एक्‍सप्रेस, पुणे-नाशिक मार्गे पुढे भुसावळ एक्‍सप्रेस या एक्‍सप्रेस गाड्यांना चिंचवड येथे येता-जाताना थांबा सन 1989 सालापासून ते आजपर्यंत उपोषण, आंदोलन, आत्मदहना सारखा मार्ग, पत्रव्यवहार केल्यानंतरच मध्य रेल्वेला जाग आली आहे.

चिंचवड येथे 1993 साली आरक्षण केंद्र सुरू झाले. तेव्हापासून ते आजतागायत “कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्ड’ ची सुविधा याठिकाणी नव्हती. त्यामुळे आरक्षित डबा कोणता हे समजत नव्हते. गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिकांची आरक्षित डब्बा शोधताना पळापळ होत होती. काही प्रवाशांची गाडी देखील चुकत होती व त्यांना तिकीटाचा आर्थिक भार सोसावा लागत होता. मात्र, आता ही गैरसोय दूर होणार आहे. प्रवाशांना आपले आरक्षित किंवा तिकीट ज्या श्रेणीचे काढले असेल त्यांना आपला डबा कोठे असणार याची आधीच माहिती समजणार आहे.

चिंचवड रेल्वेस्थानक फलाट क्रमांक 3 वर तसेच पिंपरी रेल्वे स्थानकातही ही सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी चिंचवड प्रवासी संघाने केली आहे. फलाटची मंजूर झालेली लांबी 24 डब्यापर्यंत तातडीने वाढवावी, छत आच्छादने, तसेच पिंपरी रेल्वे स्थानकात कोल्हापूर, मुंबई, सिद्धेश्‍वर एक्‍सप्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्‍सप्रेस थांबते तेथेही डिस्प्ले बोर्ड बसविण्यात यावे यासाठी रेल्वेचे पुणे विभागाचे मुख्य व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांची भेट घेणार असल्याची माहिती चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार व उपाध्यक्ष नारायण भोसले यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.