चे गवेराचे जन्मस्थळ विक्रीसाठी खुले

ब्युनोस आयर्स, (अर्जेंटिना): मार्क्सवादी क्रांतिकारक चे गवेरा याचे बोसारिया येथील लहानपणचे घर गेल्या आठवड्यात विक्रीसाठी खुले करण्यात आले आहे.
या वास्तूमध्ये चे गवेराच्या वारस्यला साजेसा सांस्कृतिक प्रकल्प सुरू करण्यास आतापर्यंतच्या अनेक मालकांना अपयश आल्यामुळे अखेर ही इमारत विक्री करण्याचा व्यवहार्य पर्याय स्वीकारण्यात आला आहे.
या 200 चौरस मीटरच्या घरासाठी किमान किंमत 4,00,000 डॉलर इतकी निश्चित करण्यात आली आहे. गेल्या दशकभरापेक्षा अधिक काळापासून या घराला अनेक घरमालक लाभले आहेत. यापैकी सध्याचे घरमालक हे फ्रान्सिस्को फॅरुगिया हे उद्योगपती आहेत.
या वास्तूची विक्री करायचे आपण यापूर्वीच निश्चित
केले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, करोनाच्या जगभर पसरलेल्या साथीमुळे त्यांना या निर्णयाप्रमाणे वास्तूची विक्री करता येऊ शकली नाही. याशिवाय त्यांची जगातील अनेक देशांमध्ये मोठमोठ्या मालमत्ता आहेत. त्यांना या व्यापातून वेळ मिळणेही अवघड झाले आहे.
चे गवेरा या कम्युनिस्ट क्रांतिकारकाचा जन्म याच घरामध्ये अर्नेस्टो इथे 1928 साली झाला होता. त्याने लॅटिन अमेरिकेमध्ये अनेक मोठी बंडे घडवून आणली. 1967 साली बोलिव्हियातील बोलविनियन सैन्याने त्याला संपवले.





