मुंबई -बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या लग्नाचा वादामुळे तर कधी तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे तीची सर्वत्र चर्चा होतांना दिसते.
View this post on Instagram
नुसरत जहाँ अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री आणि खासदार आहे. नुसरत यांनी बंगाली सिनेसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2019 मध्ये त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला
View this post on Instagram
तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. नुसरत जहाँ सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असतात. सोशल तीन नेहमीच बोल्ड फोटो पोस्ट करत असते. या फोटोशूटवर युजर्स दाद देत असतात.
View this post on Instagram
नुकतेच नुसरतने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.या फोटोंमध्ये नुसरत बेबी पिंक कलरच्या फ्लोरल प्रिंटेड लेहेंग्यात दिसत आहे. त्यांच्या दिलखेच फोटोंवर चाहत्यांनी अक्षरशः कमेंट आणि लाईक्स चा पाऊस पडला आहे.
View this post on Instagram
फोटोंमध्ये नुसरत वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे, ज्यामध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे. नुसरत जहाँ यांनी 2011 मध्ये राज चक्रवर्ती यांच्या चित्रपटातून पदार्पण केले होते.