नगर -राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरुवारी (दि. 22) एक दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार असून त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.
गुरूवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत शेवगाव, पाथर्डी अंतर्गत भालगाव, बोधेगाव येथील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर पालकमंत्री यांचे दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन होणार आहे.
दुपारी 4 वाजता करोना स्थितीबाबत महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षा, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), जिल्हा पोलीस अधिक्षक, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, संबंधित अधिकारी वर्ग यांच्या समवेत समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आढावा बैठक होणार आहे.
त्याचठिकाणी दुपारी 4.45 वाजता अहमदनगर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांबाबत आढावा बैठक होणार आहे. दुपारी 5.30 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पक्ष पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.