पालकमंत्र्यांच्या मुलाची ‘त्या’ गृहप्रकल्पात भागीदारी ?

विरोधी पक्षनेत्यांचा आरोप : न्यायालयात याचिका दाखल करणार

पिंपरी – मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी आणि बोऱ्हाडेवाडीतील नियोजित पंतप्रधान आवास योजना गृहप्रकल्पात पालकमंत्री गिरीष बापट यांच्या मुलाची भागीदारी आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. या सर्व प्रकल्पांची चौकशी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात पाच ठिकाणी गृहप्रकल्प प्रस्तावित आहेत. या कामाचे दर बाजारभावापेक्षा अधिक आहेत. राष्ट्रवादीच्या काळात चिखली येथे उभारलेल्या गृहप्रकल्पाच्या दराविषयी आरोप करणाऱ्या भाजपच्या काळातील या गृहप्रकल्पांचे दर त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक आहे. हे सर्व प्रकल्प कोट्यवधी रूपयांचे आहेत. त्यामुळे या प्रकल्पामध्ये शेकडो कोटींचा घोटाळा आहे. याशिवाय मोशी कचरा डेपोतील “वेस्ट टू एनर्जी’ हा कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प देखील संशयास्पद आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा दत्ता साने यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)