चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे वितरण

अलिबाग(जि.रायगड) : निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळात नुकसान झालेल्या तळा व माणगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त नागरिकांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे वितरण करण्यात आले.

या चक्रीवादळात नुकसान झालेल्या तळा तालुक्यातील नुकसानग्रस्त देवला रामा वालेकर, रहाटाड रु. 1 लाख 50 हजार, गणेश बबन जाधव वालेकर, रहाटाड रु. 1 लाख 50 हजार, विठोबा महादेव करंजे, रहाटाड रु. 1 लाख 50 हजार, विलास पांडूरंग मालुसरे, मांदाड, रु. 1 लाख 50 हजार, प्रतिक्षा प्रकाश दिवेकर, मांदाड, रु. 1 लाख 50 हजार, सुनिल लक्ष्मण जगताप, पिटसई, रु. 1 लाख 50 हजार, सतिश हरिश्चंद्र शिंदे रु. 1 लाख 50 हजार, सर्जेराव भागोजी जाधव रु. 15 हजार, देवजी परसू शिंदे रु. 1 लाख 50 हजार, शशिकांत शंकर शिगवण रु. 1 लाख 50 हजार, सुवर्णा सहादेव मांडवकर रु. 1 लाख 50 हजार, जनार्दन गंगाराम म्हामुणकर रु. 1 लाख 50 हजार, भिकीबाई जनार्दन शिगवण रु. 1 लाख 50 हजार असे एकूण 18 लाख 15 हजार रुपयांचे मदतीचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

तसेच चक्रीवादळात नुकसान झालेल्या माणगाव तालुक्यातील माणगाव तहसिलअंतर्गत असलेल्या गावांमधील नुकसानग्रस्त नागरिकांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेश, दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ वितरित करण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसीलदार अण्णाप्पा कनशेट्टी, नगराध्यक्षा रेश्माताई मुंढे, नगरसेवक चंद्रकांत भोरावकर, गटविकास अधिकारी विजय यादव, मुख्याधिकारी श्रीमती मडके, उत्तम जाधव, माजी सभापती पंचायत समिती, नानासाहेब भौड, नगरसेवक रोडे नगरसेवक मंगेश शिगवण,पोलीस निरिक्षक गेंगजे उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.