#oxygen | ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावरील जीएसटी हटवावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अर्थ मंत्रालयाकडे मागणी

मुंबई – देशभरात कोरोनाचे संकट वाढत असताना औषध आणि आरोग्याशी संबंधित उपकरणांची कमतरता भासत आहे. अशावेळी ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री  जयंत पाटील यांनी अर्थ मंत्रालयाकडे केली आहे.

द असोसिऐटेड चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया या संस्थेने अर्थमंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. त्याच पत्राचा आधार घेत  जयंत पाटील यांनी ऑक्सिजन आणि ऑक्सिजनजन्य साहित्यावर जीएसटी लावला जात असून हा जीएसटी हटवण्यात यावा अशी मागणी केली आहे.

हा जीएसटी हटवल्यास आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.