वाहन उद्योगाच्या वाढीसाठी दीर्घ पल्ल्याच्या धोरणाची गरज: आर सी भार्गव

नवी दिल्ली: भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्यामुळे वाहतूकही वाढणार आहे. मात्र, वाहनांसाठीच्या इंधनासाठी भारताला इतर देशावर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी पर्यायी तंत्रज्ञानावरील दिर्घ पल्ल्याच्या धोरणाची गरज आह, असे मारुती सुझुकी कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, इंधनावर अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अनेक कारणांमुळे इंधनाच्या उपलब्धतेवर आणि किमतीवर वारंवार परिणाम होत आहे. त्यामुळे भारताला वेळोवेळी अनिश्‍चित परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी पर्यायी इंधनाबाबत म्हणजे हायब्रीड तंत्रज्ञान आणि सीएनजीवरील तंत्रज्ञानात विकास होण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारकडून स्पष्ट धोरणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
 सरकारने काही वर्षापासून इलेक्‍ट्रिक वाहन निर्मितीवर भर दिला आहे. तरीही या प्रक्रियेला फारसा वेग येताना दिसून येत नाही. त्यासाठी आवश्‍यक पर्यायी पायाभूत सुविधा विकसित होण्याची गरज आहे. मात्र तरीही परंपरागत पद्धतीच्या वाहनांची संख्याही वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीएनजी चांगले इंधन आहे. त्याचा पर्यावरणावर कमी परिणाम होतो. मात्र त्यासाठीची वितरण प्रणाली पुरेशा वेगाने वाढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. इथेनॉल आणि मिथेनॉलवरही भर दिला जात आहे. ही चांगली बाब असल्याचे ते म्हणाले. अनेक क्षेत्रांत नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्याचा फायदा घेणारे धोरण असण्याची गरज वाढली आहे.
त्यासाठी पर्यायी पायाभूत सुविधा लागणार आहेत. त्यात समन्वयाची गरज असल्याचे ते म्हणाले. चीन आणि अमेरिकेदरम्यानचे मतभेद वाढत आहेत. त्याचा जागतिक व्यापारावरही परिणाम होत आहे. त्यामुळे त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे परदेशी बाबीवर कमी अवलंबून राहावे लागेल असे धोरण तयार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)