औद्योगीक उत्पादनात ‘वाढ’; मॅन्युफॅक्‍चरींग क्षेत्राची परिस्थिती ‘सुधारली’

नवी दिल्ली – डिसेबर महिन्यात औद्योगीक उत्पादनात 1 टक्‍क्‍याची वाढ नोंदली गेली आहे. या महिन्यात म्यन्युफॅक्‍चरींग क्षेत्राची उत्पादकता 1.5 टक्‍क्‍यानी वाढल्यामुळे एकूणच औद्योगीक उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे.

या महिन्यात विज उत्पादन 5.1 टक्‍क्‍यानी वाढले मात्र खाण उत्पादन 4.8 टक्‍क्‍यानी कमी झाले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात औद्योगीक उत्पादन केवळ 0.4 टक्‍क्‍यानी वाढले होते. मात्र आता हे उत्पादन 1 टक्‍क्‍यानी वाढले आहे. त्यामुळे आगामी काळात या उत्पादनात वाढ होण्याबाबात सरकार आशावादी झाले आहे.

मार्च महिन्यात भारतात लॉक डाउन सुरू करण्यात आले होते. त्यामुळे त्या महिन्यात औद्यागीक उत्पादन उणे 18.5 टक्‍के इतके झाले होते. त्यानंतर या क्षेत्रात बरेच प्रयत्न करूनही सुधारणा होत नव्हती. मात्र आता परिस्थिती सुधारू लागल्याची लक्षणे दिसत आहेत. गेल्या दान महिन्यापासून जीएसटीचे संकलनही वेगाने वाढत आहेत. त्यामुळे आगामी काळात विकास दर वेग वाढण्याची शक्‍यता असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.