भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्‍वास वाढू लागला 

निर्देशांकांची विक्रमी पातळीवर जोरदार घोडदौड 
नवी दिल्ली:  ब्यू चीप कंपन्यांच्या शेअरची गुंतवणूकदारांकडून खरेदी चालूच असल्यामुळे सोमवारी सलग सहाव्या दिवशी निर्देशांकांत वाढ झाली. आजच्या तेजीचे नेतृत्व आयसीआयसीआय बॅंक, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांनी केले. त्यामुळे शेअरबाजार निर्देशांक आज नव्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर झेपावले. अमेरिका आणि आशियायी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले असूनही भारतीय शेअर बाजारात मात्र खरेदीचे वातावरण होते. या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बॅंकेबरोबरच जपान आणि अमेरिकेच्या केंद्रीय बॅंका पतधोरण जाहीर करणार आहेत. मात्र, त्या बाबीना गुंतवणूकदार फारसे महत्व देण्यास तयार नाहीत. 
सोमवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 157 अंकानी म्हणजे 0.42 टक्‍क्‍यांनी झेपावून 37494 अंकावर विराजमान झाला. गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्‍स 840 अंकानी वाढला आहे. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 41 अंकांनी वाढून 11319 अंकावर बंद झाला. मोठ्या कंपन्यांबरोबच छोट्या कंपन्यांच्या शेअरची चांगली खरेदी झाल्यामुळे स्मॉल कॅप 0.55 टक्‍क्‍यांनी अंकानी तर मिड कॅप 0.30 टक्‍क्‍यांनी वाढला. 
आता परदेशी संस्थागत गुंतवणूकदार परतू लागले असल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे. क्रुडचे दर कमी होण्याची शक्‍यता असल्यामुळे या गुंतवणूकदारांनी भारतातून काढता पाय घेण्याची भूमिका आता काही प्रमाणात तरी बदलली असल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे. 
अगोदर केवळ काही कंपन्यांचे शेअर वाढत असल्यामुळे निर्देशांक वाढत होते. बाजारात या विषम वाढीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आता सर्व कंपन्यांच्या शेअरची खरेदी होत असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर मिड कॅप आणि स्मॉलकॅपमध्ये वाढ झाली. आरतापर्यंत छोट्या कंपन्याचे मुल्यांकन आवश्‍यकतेपेक्षा जास्त असल्याची भावणा बाजारात निर्माण झाली होती. 
ब्ल्यू चीप कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करीत असतांनाच जीएसटी परिषदेने 100 वस्तूवरील जीएसटी कर तब्बल 10 टक्‍क्‍यानी कमी करून तो केवळ 18 टक्‍के केला. क्रुडचे दर कमी झाल्यामुळे रुपया बराच सावरला. अमेरिका आणि युरोपियन समुदायातील व्यापारातील तणाव कमी होत आहे. आतापर्यंत परत जात असलेले परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आता परतू लागले आहेत. या सर्व कारणामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांबरोबरच किरकोळ गुंतवणूकदाराकडून बरीच खरेदी झाली आणि निर्देशांक नव्या विक्रमी पाळीवर गेले. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)