माळेगाव – गेल्या १५ वर्षांपासून पुणे, सातारा, नगर जिल्ह्यातील नागरिकांना बंगलो प्लॉट्स उपलब्ध करुन देणारे अमर काटे व मंगेश काटे बंधूंनी ईरा डेव्हलपर्स मार्फत होत असलेल्या बारामती शहरालगत असलेल्या शारदानगर येथील अन्वीदेव सोसायटी, ईरानगर येथे सर्व सोयीयुक्त बंगलो प्लॉटस्चे भव्य भूमिपूजन केले. काटे बंधूंनी सर्वसामान्य नागरिकांना बंगलो प्लॉटची निर्मिती केली आहे.
अन्वीदेव सोसायटी ईरानगर येथे फक्त ५.५० लाख रुपये गुंठ्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना ही मोठी दर्जेदार संधी काटे बंधूंनी दिली आहे. बारामती शहरालगत शारदाबाई पवार महाविद्यालय, शरदचंद्र पवार ग्री कॉलेज, सायन्स पार्क, कृषी विज्ञान केंद्र, रिंग रोड, मेडिकल कॉलेज व इतर विकास होत असलेल्या बारामती नगरपालिकेच्या हद्दीत ही अन्वीदेव सोसायटी ईरानगर आहे. सोसायटीमध्ये बंगलो प्लॉट घेणाऱ्या ग्राहकांना सर्व सुविधांसह भव्य प्रवेशव्दार मिळणार आहे. त्यामध्ये अंतर्गत ३० फूट रुंदीचे डांबरी रस्ते, प्रत्येक प्लॉटला पाणी व विज कलेक्शन, ड्रेनेज सुविधा, स्ट्रीट लाईट, रस्त्याच्या कडेला वृक्षरोपण, सर्व सोसायटीला कुंपण आणि महत्वाचे म्हणजे सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार तयार केले आहेत.
अन्वीदेव सोसायटी, ईरानगर ही भारतातील सर्वात मोठे असलेल्या कृषी विज्ञान केंद्रासमोर असून या सोसायटीमध्ये नागरिकांना सर्व सुविधा आम्ही काटे बंधूंनी देण्याचा प्रयत्न केला आहे. काहीच प्लॉट शिल्लक असल्याने नागरिकांनी लवकर संपर्क करावा. – अमर काटे (चेअरमन-ईरा डेव्हलपर्स)