शिक्रापूर -करोना संकटाचा सामना करीत नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या करोना योद्ध्यांना शिक्रापूर (ता. शिरूर) येथे आमदार अशोक पवार व पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार यांच्या वतीने किराणा किट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतीचे कर्मचारी, प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच आशा सेविका यांच्यासाठी मदतीचा हात दिला आहे.
याप्रसंगी तलाठी अविनाश जाधव, आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते, अंजना भुजबळ, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक अरुण करंजे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब सासवडे, आबाराजे मांढरे, सोमनाथ भुजबळ, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मयूर करंजे, ऍड. अतुल ताजणे उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.