एयर स्ट्राइकमुळे पाकिस्तान आणि राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर दुःख- अमित शाह

अरुणाचल प्रदेश – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी  शुक्रवारी अरुणाचल प्रदेश येथील चांगलांग येथे जनसभेत राहुल गांधींवर हल्लाबोल केला. या जनसभेत अमित शाह ने राहुल गांधीवर टीका केली की,’एयर स्ट्राइकनंतर संपूर्ण देशातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद  दिसत होता तर दुसरीकडे पाकिस्तान आणि राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते. राहुल गांधी यांचे गुरु सॅम पित्रोदा यांनी पाकिस्तानवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याविषयी शंका व्यक्त केली होती. त्यांच्या मते, एयर स्ट्राइक का केली ? मात्र आमची सरकार दहशतवाद्यांशी कधीच बोलू शकणार नाही. भारतावर पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी यापूर्वीही हल्ले केले आहे. मात्र काँग्रेस सरकारने काहीच केले नाही. नरेंद्र मोदी सरकारने दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.