बेंगळुरू – समाज माधयमांवर देशव्यापी शेतकऱ्यांच्या निदर्शनांबाबतची माहिती पसवणाऱ्या “टूलकीट’च्या प्रसारात सहभागी झाल्याबद्दल बंगळुरू येथील त्यांच्या घरातून 21 वर्षीय पर्यावारणवादी कार्यकर्ती दिशा रवी यांना अटक करण्यात आली. दरम्यान, तिच्या कुटुंबियांनी हे सर्व आरोप रविवारी फेटाळून लावले आहेत.
स्वीडीश पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी हे “टूलकिट’ वापरून शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणारे ट्विट केल्यानंतर तिच्यावर देशद्रोह, दोन गटांत वैमनस्य पसरवणे आणि गुन्हेगारी कट रचणे अशा गंभीर गुन्ह्याखाली चार फेब्रुवारीला गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोएटीक जस्टीस या खलीस्तान वाद्यांच्या गटाच्या सहकार्याने हे “टूलकिट’ बनवल्याचा पोलिसांचा आरोप होता.
या “टूलकिट’च्या प्रसाराबाबात आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. या कामात ती आणखी काही जणांच्या संपर्कात होती का ? हेही आम्हाला तपासायचे आहे, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. रवी यांना अटक केली असून नंतर त्यांना न्यायलयात हजर करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र दिल्ली पोलिसांनी या अटकेला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही, असे हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.
रवी ही फ्रायडे फॉर फ्युचर या संघटनेची संस्थापक असून व्यवसाय व्यवस्थापनाची पदवीधर आहे. दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत या “टुलकीट’च्या संपादनात सहभाग असल्याचे तिने मान्य केले आहे. तिला पोलिस कोठडी मिळाल्यानंतर तिची चौकशी करण्यात येईल.
आणखी काही जणांना अटक?
या प्रकरणात आणखी काही जणांची अटक होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी “टूलकीट’शी संबंधित लोक आणि गुगलमार्फत शेतकरी आंदोलन करणाऱ्या लोकांची माहिती त्यांनी मागवली आहे.
कुटुंबिय धास्तावले
दिल्ली पोलिसांनी आमच्यातून आमच्या घरातील आमची मुलगी जी कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती, एकल माता आणि प्राण्यांवर जीवापाड प्रम करणारी आहे, तिला आमच्यापासून हिसकावून घेतल्याने आम्ही निराश आहोत. पर्यावरण बदलाबाबत जागृती करणारी ती एक तरूणी होती. अनेक पर्यावरणवादी तरूणांच्या गटात तीचे काम सुरू असे, असे तिच्या कुटुंबियांनी रविवारी माध्यमांना सांगितले.