पुलवामा – लोकसभेच्या निवडणूकीतील पाचव्या टप्प्यामध्ये आज मतदानाला जोरदार सुरवात झाली आहे. बिहारमधील 5, जम्मू काश्मीरमधील 2, झारखंडमधील 4, मध्यप्रदेशातील 7, राजस्थानातल्या 12, उत्तर प्रदेशातील 14, पश्चिम बंगालमधील 7 अशा एकूण 51 मतदारसंघांसाठी आज मतदान होणार आहे. यामध्ये पुलवामाचा देखील समावेश असून, येथे यावेळी मतदानाला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. पुलवामा येथील मतदान केंद्राजवळ ‘ग्रेनेड हल्ला’ करण्यात आला आहे. त्यामुळे येथील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. मात्र, ग्रेनेड हल्ल्यामध्ये कोणत्या प्रकारची हानी झाली का? याबद्दल अजून तरी कोणतीही माहिती समोर आली नाही.
दरम्यान याठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून लोकांच्या रांगा मतदान केंद्राबाहेर लागल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे. यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामातील अवंतीपुरा येथील आत्मघातकी हल्ल्यात ४० सीआरपीफ जवान शहीद झाले होते.