Grenade Attack on CRPF bunker । जम्मू-काश्मीरमध्ये मोठा ग्रेनेड हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. आज श्रीनगरमध्ये हा हल्ला झाला आहे.
ऑल इंडिया रेडिओ स्टेशनच्या बाहेर सीआरपीएफच्या बंकरवर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 12 नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती माध्यमांनी दिली आहे.
काल, अनंतनाग आणि श्रीनगरच्या खानयारमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली, ज्यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले.
ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानस्थित लष्करचा एक वरिष्ठ कमांडर होता, जो मोठा गुन्हा करण्यासाठी या भागातील एका घरात लपून बसला होता.