श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका मंदिरावर ग्रेनेड हल्ला केला आहे. परंतु, निशाणा चुकल्याने मोठी हानी टळली. यावेळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी ७.३०च्या दरम्यान दहशतवाद्यांनी एका मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, निशाणा चुकल्यामुळे या ग्रेनेड मंदिरावर न पडता बाजूच्या परिसरात स्फोट झाला.
या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती कठुआचे पोलीस अधीक्षक शालिंदर मिश्रा यांनी दिली आहे. तसेच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी तात्कळ शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर कुटुंबीयांने ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. बनावट चकमकीत यांची हत्या करुन ते दहशतवादी असल्याचा दावा केला जात असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.