श्री वाघेश्वरी विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
नीरा (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव असलेल्या पिंगोरी येथील श्री वाघेश्वरी माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिवर गीतावरती नृत्यांमधून पिंगोरी येथील कारगील युद्धात शहीद झालेले शंकर शिंदे व श्रीलंकेत शांती सेनेत असताना शहीद झालेले रमेश शिंदे यांना अभिवादन केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळेमुळे येथील नागरिकांचा कंठ दाटून आला.
पिंगोरी येथील श्री वाघेश्वर माध्यमिक महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन रविवार (दि. 26) घेण्यात आले. यावेळी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर पिंगोरीच्या सरपंच विद्या यादव, पोलीस पाटील राहुल शिंदे, माजी उपसरपंच धनंजय शिंदे, सोसायटीचे चेअरमन महादेव शिंदे, सिनेकलावंत विनोद शिंदे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष दत्ता शिंदे, पोलीस हवलदार भानुदास जगदाळे, पो.कॉ. समीर हिरंगुडे आदींसह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शरद जगताप यांनी केले.
आभार शोभा चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक भावराव ठाकरे गौरी भोंडे, ज्योती जगताप यांनी केले. संदीप कांबळे, अमित बोरगावचे, प्रतीक चिव्हे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.