कामगारनगरीचे “क्रांतिसूर्या’ला अभिवादन

महात्मा फुले यांची जयंती ः महापालिकेच्या प्रबोधन पर्वाला सुरुवात

पिंपरी – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या वतीने आयोजित प्रबोधन पर्वालाही आजपासून (दि. 11) सुरूवात झाली. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे सावट कार्यक्रमांवर दिसून आले.

महापालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीत सकाळी त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्‍त आयुक्त संतोष पाटील व दिलीप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, आदी उपस्थित होते. यानंतर पिंपरी येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील व दिलीप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

शहर कॉंग्रेसच्या वतीने पिंपरीतील महात्मा फुले स्मारक येथील पुतळ्यास शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संग्राम तावडे, गिरीजा कुदळे, मयुर जयस्वाल, मकरद्वज यादव, शहाबुद्दीन शेख, संदेश बोर्डे, विशाल कसबे, किशोर कळसकर, लक्ष्मण रुपनर, हिरामण खवळे, संदेश नवले, आबा खराडे, सुनील राऊत आदी उपस्थित होते.

कॉंग्रेस पर्यावरण विभागातर्फे मेळावा घेण्यात आला. अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सचिव सोनल पटेल, राष्ट्रवादीचे प्रभारी घनःश्‍याम शेलार यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेळाव्याला सुरूवात करण्यात आली. चलो वार्ड अभियानाबद्दल युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते व दहा नागरिकांचा सत्कार करण्यात आला. युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांना राजीव गांधी आदर्श युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशोक मोरे, मनोज कांबळे, निगार बारस्कर, गौतम आरकडे, अशोक मंगल आदी उपस्थित होते.

जय मल्हार क्रांती संघटना पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्हा यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपळे सौदागर येथील मारुती मंदिरामध्ये झालेल्या कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय धनवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सुभाष जाधव, रोहिदास मदने, दादा गोरगले, दीपक माकर, दिलीप धनवटे, शांताराम गोफणे, दत्तात्रय धनवटे आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स इतर मागासवर्गीय कर्मचारी संघाच्या वतीने एच. ए. कॉलनीमध्ये आयोजित महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाला आजपासून सुरूवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे सहायक संचालक कुणाल शिरसाठे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी उपमहापौर महंमद पानसरे अध्यक्षस्थानी होते. एच. ए. मजदूर संघाचे सरचिटणीस सुनील पाटसकर, माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, एच. ए. कंपनीच्या वित्त विभागाचे उप महाप्रबंधक सी. व्ही. पुरम, ज्ञानेश्‍वर कांबळे, कैलास नरुटे आदी उपस्थित होते. कुणाल शिरसाटे यांचे व्याख्यान झाले. मारुती बोरावके यांनी प्रास्ताविक केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.