जिनिव्हा : अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांना मलेरीया रोधक हायड्रोक्लोरोक्विन गोळ्यांचा पुरवठा भारताने केल्यानंतर दुसऱ्या देशांना करोनाच्या लढतीत मदत करणाऱ्या देशांना मी सलाम करतो, अशीे भावनिक दाद संयुक्त राष्ट्रेचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यानीं दिली.
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने करोना बाधितांवरील उपचारात हायड्रोक्लोरोक्विन या औषधाच्या वापराला मान्यता दिली असून सुमारे दीड हजार जणांवर त्याचा वापर केला आहे. गेल्या काही दिवसांत त्याची मागणी वाढल्यानंतर भारताने त्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली. या विषाणू विरोधातील लढ्यासाठी जगाच्या एकात्म प्रयत्नांची अवश्यकता असल्याचे सांगून सरचिटणीस म्हणाले, जे मदत करण्याच्या अवस्थेत आहेत अशा देशांनी इतरांना मदत केली पाहिजे. असे करणऱ्या देशांना आम्ही सलाम करतो.
भारत अन्य देशांना औषधे पाठवत आहे. त्याबाबतचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना गुटेरस बोलत होते. करोनासारख्या वैश्विक साथीच्या विरोधात अवघ्या जगाने हातात हात घालून काम केले पाहिजे अशी भारताची भुमिका आहे.