रेडा -लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊंचे जीवन, त्यांचे विचार आणि त्यांची उपलब्ध असलेली मुबलक साहित्यसंपदा समाजासाठी पथदर्शक आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य, माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण माने यांनी केले. इंदापूर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती इंदापूर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, ऍड. नारायण ढावरे, अशोक मखरे, मयूर ढावरे, चंद्रकांत सोनवणे, दिलीप शिंदे, राजू शिंदे, बाळासाहेब अडसूळ, सतीश सागर, नंदू खंडाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, बापू अडसूळ, बाळासाहेब लोखंडे, उमेश ढावरे, अनिल ढावरे उपस्थित होते. यावेळी 150 श्रमिक कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. इंदापूर नगरपरिषद संचलित सत्यशोधक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ग्रंथालय येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माने यांनी ग्रंथालयास पुस्तके खरेदीसाठी 25 हजार रुपये दिले.
“शांताई’मध्ये ऑनलाइन शिक्षणातून राष्ट्रप्रेम जागृत
चिंबळी -शांताई मेमोरियल स्कूल ऍण्ड कॉलेज, चिंबळी फाटा (ता. खेड) येथे विद्यार्थ्यांनी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भाषण केले. परवीन शेख यांनी बकरी ईदबाबत मुलांना माहिती सांगितली. या तिन्ही कार्यक्रमानिमित्त वाद-विवाद आणि स्पेल-बी स्पर्धा घेण्यात आल्या. या ऑनलाइन कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे अध्यक्ष अनुराग जैद पाटील आणि स्वाती जैद पाटील उपस्थित होते. रोहितसर, सरस्वती कुडकी, प्राजक्ता कांबळे, सुरभी बांदेकर, श्रेया बोधुले, शिल्पा शिकारे आणि तेजस्वी शेठे या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला, असे शाळेच्या प्राचार्या प्रिया बवले यांनी सांगितले.
चिंबळी फाटा (ता. खेड) येथील श्रीसर्मथ इंग्लिश मीडियम स्कूल ऍण्ड कॉलेजमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साधेपणाने करण्यात आली असल्याचे प्राचार्य अनिता टिळेकर यांनी सांगितले. या निमित्ताने प्रतिमा पूजन पुष्पहार अर्पण करून केले आणि दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे , सचिव विद्या गवारे, सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
नीरेत प्रतिमा पूजन
नीरा -येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती शनिवारी (दि. 1) साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी नीरा ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. अश्विनी घाटगे यांच्या हस्ते अण्णा भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती गोरखनाथ माने, माजी सभापती दत्ताजी चव्हाण, उपसरपंच विजय शिंदे, माजी सरपंच राजेश काकडे, माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले, सदस्य अनिल चव्हाण, दीपक काकडे, गणपत लाकडे, भैया खाटपे, फौजदार विजय वाघमारे, सुदर्शन होळकर, सुनील पाटोळे, संतोष गवळी, पोपट खुडे, सागर पाटोळे, सागर भिसे, रमेश वाघमारे, शिवाजी गोरे, दीपक जाधव, गणेश पाटोळे, सूरज खुडे, दादासाहेब गायकवाड उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी अश्विनी घाडगे, पत्रकार राहुल शिंदे, भरत निगडे, मंगेश ढमाळ, लहुजी वस्ताद सेनेचे बारामती तालुका अध्यक्ष राजेंद्र भिसे यांचा गौरव करण्यात आला.
सासवडला अण्णा भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
सासवड -येथेनगरपालिकेसमोर मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, भाजपचे पुरंदर तालुका अध्यक्ष आर. एन. जगताप व संस्थापक म्हस्कू शेडगे यांनी अण्णा भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे, माजी सभापती नीलेश जगताप, आबासाहेब खवले, भाऊसाहेब चखाले, महादेव भोंडे, संदीप भोंडे, अण्णा आवसरे, लक्ष्मण मांढरे, संजीव महापुरे, गणेश लवांडे, राजेंद्र जगताप, भानुदास कुंभारकर, संजय खंडाळे, संदीप भोंडे, महादेव भोंडे उपस्थित होते.