सहारा वाळवंटावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘हरित भिंत’

सहारा डेझर्ट – जगातील सर्वात मोठ्या वाळवंटाचा म्हणजेच सहारा डेझर्टचा आकार दिवसेंदिवस वाढत चालत असल्याने या वाढत्या वाळवंटावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोठी हरित भींत उभारण्याचा प्रकल्प सध्या सुरू आहे. ग्रेट ग्रीन वॉल नावाने ओळखली जाणारी ही भिंत पंधरा किलोमीटर रुंद आणि चार हजार किलोमीटर लांब असणार आहे.

गेल्या शंभर वर्षांच्या कालावधीमध्ये सहारा वाळवंटाचे क्षेत्रफळ दहा टक्‍क्‍याने वाढले आहे. आफ्रिकेतील 11 देशांमध्ये सहारा वाळवंट पसरलेले आहे. हे क्षेत्रफळ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सहारा वाळवंटला जोडणारे अनेक प्रदेश दिवसेंदिवस कोरडे आणि जलहिन बनतत चालले आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 2007 मध्ये आफ्रिकी संघाने एका विशेष प्रोजेक्‍टला सुरुवात केली होती. त्याप्रमाणे या वाढत्या वाळवंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका हरित भिंतीची उभारणी करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता.

हरित भिंतीमध्ये मोठ्याप्रमाणावर वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे पश्‍चिम आफ्रिकेतील सेनेगल आणि पूर्व आफ्रिकेतील जिबूती या देशांच्या मध्ये शंभर दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रामध्ये वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. 2030 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी आशा करण्यात येत आहे. पण या प्रकल्पाला पैसे कमी पडत आहेत.

त्यामुळे पर्यावरणवादी संस्था आणि इतर देशांनी या प्रकल्पाला आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रेट ग्रीन वॉल वर सर्वात जास्त क्षमतेने काम सध्या इथे इथिओपिया मध्ये सुरू आहे व सामान्य नागरिकही आपण होऊन या मोहिमेमध्ये भाग घेत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.