नवी दिल्ली – नवी दिल्ली ते बरेली या मार्गावरील पहिल्या उड्डाणाला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज हिरवा झेंडा दाखविला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने सर्व महिला कर्मचाऱ्यांद्वारे केलेल्या या पहिल्या उड्डाणासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि बरेलीचे खासदार संतोष गंगवार देखील.उपस्थित होते. नागरी उड्डाण मंत्रालयाचे आणि भारतीय विमान प्राधिकरणाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या समारंभाला दूरदृश्य प्रणालीद्वारे हजेरी लावली.
भारत सरकारच्या उडे देश का आम नागरीक या अंतर्गत प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेद्वारे बरेली येथील विमानतळाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. उडान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 325 मार्ग, 5 हेलिपोर्ट, 56 विमानतळ आणि 2 जल विमानस्थानके कार्यान्वित करण्यात आले आहेत.