कवी दिल्ली : जगभरासह भारतातही गेल्या २ महिन्यांपासून लसीकरण मोहिम सुरू झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात कोरोनाचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जात आहे. हे सर्व सुरु असताना भविष्यात कोरोनाची लस घेण्यासाठी सुई टोचून घेण्याची गरज पडणार नाही. होय, कारण त्यासाठी फक्त एक कॅप्सूल खाल्यानंतर तुम्हाला फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोना कॅप्सूल एक भारतीय औषध कंपनी अमेरिकी औषध कंपनीसह मिळून तयार करत आहे. कॅप्सूल लस भारतात तयार होत आहे. हे औषध तयार करत असलेल्या कंपनीचे नाव प्रेमास बायोटेक आहे. भारतीय औषध कंपनी प्रेमास बायोटेक अमेरिकी औषध कंपनी ओरामेड फार्मास्यूटिकल्ससह मिळून ही लस तयार करत आहेत. दोन्ही कंपन्यांनी १९ मार्चला कोरोना व्हायरसची ओरल लस तयार करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार कॅप्सूल लसीच्या सिंगल डोसने कोरोनाशी लढण्यासाठी मदत होईल. ही लस खूप प्रभावी आहे.
Premas is proud to launch ORAVAX – a joint venture with Oramed Pharmaceuticals. The venture combines Premas D-Crypt™ technology with Oramed’s POD™ oral delivery of proteins technology to develop a first of its kind Oral #COVID19 #vaccine candidate.https://t.co/3LPOXB7Ayx pic.twitter.com/71Xuh1V2Wh
— Premas Biotech (@PremasBiotech) March 19, 2021
कॅप्सूल लसीचे नाव ओरावॅक्स कोविड-१९ कॅप्सूल आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या संशोधनादरम्यान कॅप्सूलची लस खूप प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. ही लस न्यूट्रीलायजिंग एंटिबॉडी आणि इम्यून रिस्पॉन्स ही दोघंही काम करत आहे. यामुळे आपला रेस्पिरेटरी आणि गॅस्ट्रोइंटेस्टाईनल ट्रॅक कोरोना संक्रमण सुरक्षित राहतो.
प्रेमास बायोटेकचे सह संस्थापक आणि प्रंबध मॅनेजर डॉ. प्रबुद्ध कुंडू यांनी सांगितले की,”ओरावॅक्स कोरोनाची लस वीएलपी नियमांवर आधारित आहे. ही लस कोरोना व्हायरसपासून तीनपटींनी अधिक सुरक्षा देईल. कोरोना व्हायरसचे इंक प्रोटीन, मेम्ब्रेन एम आणि एनवेलप-ई टारगेट्स या तीन्हींपासून बचाव करेल. या औषधामुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने येत असलेल्या श्वसनाच्या अडथळ्यांपासून बचाव होऊ शकतो.”