कोरोनामुक्तीच्या लढ्याला पुणे जिल्ह्यात मोठे यश

आतापर्यंत लाखावर बाधित झाले कोरोनामुक्त

पुणे- जिल्ह्यातील कोरोनामुक्त व्यक्तींच्या संख्येने नुकतेच एक लाखाचा टप्पा पार केला आहे. 1 लाख 35 हजार 837 पैकी तब्बल 1 लाख 2 हजार 851 बाधित करोनामुक्त झाले असून, जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 75.71 टक्के इतके आहे. ही टक्केवारी दिलासा देणारी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शहर हद्दीतील करोनामुक्तांची संख्या अधिक आहे.

पुणे शहरात 9 मार्च रोजी पहिला कोरोना बाधित सापडला आणि प्रशासन कामाला लागले. सुरवातीला शहर परिसरातच प्रादुर्भाव वाढत होता. त्यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये तुलनेने खूप कमी प्रादुर्भाव होता. तर ग्रामीण भागात तब्बल दोन महिने करोनाचा थोपविण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र, मे महिन्यापासून शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला.

विशेषत: जून अखेर आणि जुलै महिन्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. सध्या शहर परिसरात बाधितांची संख्या कमी होत असली तरी ग्रामीण भागात संख्या वाढत आहे.

जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची आकडेवारी (20 ऑगस्टपर्यंत)
परिसर – कोरोनामुक्त संख्या

पुणे शहर- 62,349
पिंपरी-चिंचवड -27,283
नगरपरिषद -2,522
कॅन्टोन्मेंट बोर्ड -2,299
ग्रामीण- 8,398

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.