अशोक पवारांच्या “रोड शो’ला उदंड प्रतिसाद

खासदार डॉ. कोल्हे, प्रकाश धारिवाल यांनी केले नेतृत्व

शिरूर- शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिरूर नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहरात शुक्रवारी (दि. 18) “रोड शो’ काढण्यात आला. या “रोड शो’ला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. शहरामध्ये रॅलीचे ठिकठिकाणी उत्त्फूर्त स्वागत करण्यात आले.

शिरूर येथील बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर या “रोड शो’ला सुरुवात झाली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देखील मान्यवरांनी अभिवादन केले. या “रोड शो’ला मिळालेला प्रतिसाद पाहून ही तर अशोक पवार यांच्या विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्‍त केली. “रोड शो’साठी सजविण्यात आलेल्या रथावर खासदार डॉ. कोल्हे, प्रकाश धारीवाल, अशोक पवार, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, पंचायत समितीचे सभापती विश्‍वास कोहकडे, सभापती शशिकांत दसगुडे, कॉंग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष महेश ढमढेरे, तालुकाध्यक्ष रवी काळे, राजेंद्र जगदाळे, प्रभाकर डेरे, नगरसेवक अभिजित पाचर्णे, माजी नगरसेवक संतोष भंडारी आदी उपस्थित होते.

ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या “रोड शो’च्या पुढे ठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात येत होती. या रॅली दरम्यान अशोक पवार यांनी शहर परिसरातील अनेक ज्येष्ठांचे व नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन आशीर्वाद घेतले
शिरूर : महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या “रोड शो’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.