जीएसटी संकलनात विक्रमी वाढ

कोरोना संकटात मोदी सरकारला मोठा दिलासा

नवी दिल्लीः देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये सरकारला दिलासा मिळाल्याची बातमी समोर आलीय. एप्रिल महिन्यात देशातील GST collection विक्रमी पातळीवर पोहोचलाय. एप्रिल महिन्यात एकूण जीएसटी संकलन 1,41,384 कोटी रुपये होते, जो एक नवीन विक्रम आहे. त्यापैकी केंद्रीय जीएसटी 27,837 कोटी, राज्य जीएसटी 35,621 कोटी आणि आंतर जीएसटी 68,481 कोटी आणि सेस 9,445 कोटी आहे. आयजीएसटीमध्ये केवळ आयात केलेल्या वस्तूंवर कर लावून 29,599 कोटी रुपये कमावले आहेत.

 

 

मार्च महिन्यातील जीएसटी संकलन 123902 कोटी रुपये होते, जे आतापर्यंतच्या कोणत्याही महिन्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. एप्रिलमधील जीएसटी संग्रह जुन्या आकडेवारीपेक्षा खूप पुढे गेलाय. गेल्या सहा महिन्यांतील जीएसटी संकलनावर नजर टाकल्यास मार्चमध्ये 123902 कोटी, फेब्रुवारीमध्ये 113143 कोटी, जानेवारीत 119875 कोटी, डिसेंबरमध्ये 115174 कोटी, नोव्हेंबरमध्ये 104963 कोटी, ऑक्टोबरमध्ये 105155 कोटी होते.

गेल्या सहा महिन्यांपासून जीएसटी संकलनात वाढ होत असून, एप्रिलमध्ये जीएसटी संग्रह मार्चच्या तुलनेत 14% जास्त आहे. त्याचबरोबर या महिन्यात घरगुती व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) मागील महिन्याच्या तुलनेत 21% जास्त आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.