पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षेची नवी तारीख जाहीर झाली आहे. २१ मार्चला एमपीएससीतर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी कोचिंग क्लासेसला परवानगी दिली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठरलं तर! ‘या’ तारखेला होणार एमपीएससीची परीक्षा
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कोचिंग क्लासेसला परवानगी द्यावी, अशी सूचना आपण आजच्या पालकमंत्री अजितदादांच्या बैठकीत केली असता, ती सूचना मान्य करण्यात आली असून नियम पाळून ५० टक्के आसन क्षमतेत परवानगी देण्यात आली आहे, असे मोहोळ यांनी सांगितले आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला परवानगी !
स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कोचिंग क्लासेसला परवानगी द्यावी, अशी सूचना आपण आजच्या पालकमंत्री श्री. अजितदादांच्या बैठकीत केली असता, ती सूचना मान्य करण्यात आली असून नियम पाळून ५० टक्के आसन क्षमतेत परवानगी देण्यात आली आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 12, 2021
Big Breaking : पुण्याच्या लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय; जाणून घ्या काय चालू, काय बंद?
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अवघ्या तीन दिवसांवर होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील नवी पेठ येथे स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या संतापाचा उद्रेक पाहावयास मिळाला होता. तब्बल पाचव्यांदा विविध कारणांनी पुढे ढकलण्यात आलेली ही परीक्षा झालीच पाहिजे, अशी आग्रहाची मागणी करीत उमेदवारांनी राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.