मोठा दिलासा ! देशात नव्या कोविड रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांचे प्रमाण अधिक; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक

नवी दिल्ली, दि. 15 – देशात जे नवीन करोना रुग्ण आढळून येत आहेत त्यापेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या सुधारते आहे. गेल्या पाच दिवसांत चौथ्यांदा बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. गेल्या 24 तासांतील आकडेवारीनुसार एकूण 3 लाख 26 हजार 98 नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

तथापि गेल्या 24 तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 53 हजार 299 इतकी झाली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 83.83 टक्के इतका आहे. देशात जे एकूण कोविड रुग्ण आहेत त्यात देशातील दहा राज्यांत एकूण 70.49 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच या दहा राज्यांतच कोविडचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.

अन्य राज्यांमध्ये तुलनेने या दहा राज्यांतील स्थिती चांगली आहे असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असून गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रातील 53 हजार 249 रुग्ण बरे झाले आहेत. त्या खालोखाल कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, तमिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.