मोठा दिलासा ! कोविड केसेस 29 हजारांच्याही खाली

नवी दिल्ली  – देशातील नवीन कोविड रूग्णांमध्ये काल आणखी घट दिसून आली असून काल ही संख्या परवाच्या 29 हजारांपेक्षाही खाली आली आहे. काल दिवसभरात कोविडचे एकूण 28 हजार 326 नवीन रूग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान काल दिवसभरात कोविडमुळे 260 जण मरण पावले असून त्यामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता 4 लाख 46 हजार 918 इतकी झाली आहे. काल राष्ट्रीय कोविड रिकव्हरी रेट 97.77 इतका होता.

देशातील सध्याच्या ऍक्‍टिव्ह केसेस 3 लाख 3 हजार 476 इतक्‍या झाल्या आहेत. कालचा दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेट 1.90 टक्के इतका होता. गेले 27 दिवस हा रेट सतत 3 टक्‍क्‍यांच्या खाली आहे. दरम्यान देशातील कोविडची लस घेतलेल्या नागरीकांची एकूण संख्या आता 85 लाख 60 हजार इतकी झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.