आरबीआयकडून ग्राहकांना मोठा दिलासा

एटीएमच्या नियमांमध्ये महत्वाचे बदल

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयकडून एटीएमच्या नियमांमध्ये महत्वाचे आणि मोठे बदल केले आहेत. ज्याचा ग्राहकांना फायदा होणार आहे. एटीएममध्ये पैसे काढतांना अनेकदा वेगवेगळ्या समस्या येतात. बॅंक मात्र असे ट्रांजेक्‍शन देखील मोजते. ज्यामुळे तुमचे फ्री ट्रांजेक्‍शन देखील कमी होतात. पण आता एटीएम नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. बॅंक फेल ट्रांजेक्‍शनवर आता कोणताच चार्ज घेतला जाणार नसल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॅंक ग्राहकांना मोजकेच फ्री ट्रांजेक्‍शन दर महिन्याला देते. त्यानंतर ग्राहकांना प्रत्येक ट्रांजेक्‍शनसाठी चार्ज लावला जातो. फ्री ट्रांजेक्‍शननंतर ग्राहकांना ग्राहकांना पैसे निघाले नाही तरी त्याचा चार्ज लागतो. ग्राहकांच्या तक्रारीनंतर आरबीआयने आता नियमांमध्ये बदल करण्याचं ठरवलं आहे. बॅंकेकडून 5 ते 8 फ्री एटीएम ट्रांजेक्‍शन दिले जातात.  स्टेट बॅंक ऑफ इंडिया सेविंग अकाउंटवर 8 फ्री ट्रांजेक्‍शन देते. एसबीआई 5 फ्री ट्रांजेक्‍शन एसबीआय एटीएम आणि तीन इतर बॅंकांच्या एटीएमवर दिले जातात. छोट्या शहरात 10 फ्री ट्रांजेक्‍शन दिले जातात. आता बॅंक नॉन कॅश ट्रांजेक्‍शन, जसे बॅंकेतील रक्कम पाहणे, चेक बुक अप्लाय, टॅक्‍स पेमेंट किंवा फंड ट्रांसफरला एटीएम ट्रांजेक्‍शनच्या कक्षेतून बाहेर केले आहे. म्हणजे आता हे फ्री ट्रांजेक्‍शनमध्ये मोजले जाणार नाही. बॅंक फेल ट्रांजेक्‍शन देखील एटीएम ट्रांजेक्‍शन म्हणून मोजले जाणार नाही. तसेच पिन वॅलिडेशनमुळे एटीएम ट्रांजेक्‍शन फेल झाले तर ते देखील यामध्ये ग्राह्य धरण्यात येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)