भरीव तरतुदीमुळे विकासदर वाढेल – फडणवीस

मुंबई : अर्थसंकल्प संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प विकासकाला चालना देणारा असून शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद असल्याचे माजी मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे देखील अभिनंदन केले आहे.

कृषी क्षेत्रासमोरची मोठी आव्हाने लक्षात घेऊन, शेतकऱ्यांसाठी १६ कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. वाहतूक, निर्यात, बाजारपेठ उत्पादकता वाढवण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याची प्रतिक्रिया यांनी दिली.

रोजगार निर्मिती करायची असेल तर, पायाभूत सुविधांवर गुंतवणूक करावी लागेल. अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीमुळे देशाचा विकासदर निश्चित वाढेल. वैद्यकीय सुविधा, देशभरातील रस्ते आणि महामार्ग रेल्वेच्या विविध प्रकल्पचा अर्थसंकल्पात समावेश असल्याचे फडणवीस म्हणाले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.