जबरदस्त ! 200 पेक्षा अधिक भारतीयांचा जागतिक स्तरावर ‘दबदबा’

प्रभात ऑनलाइन – संपूर्ण जगात भारतीयांनी आपल्या कर्तृत्वाचे झेंडे रोवले आहेत. अमेरिकेपासून ब्रिटनपर्यंत भारतीयांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. दरम्यान, समोर आलेल्या एका यादीने भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल. ‘2021 इंडिया स्पोरा गव्हर्नमेंट लीडर’च्या पहिल्या प्रकारच्या यादीमध्ये ही माहिती देण्यात आली.

या यादीनुसार भारतीय वंशाचे 200 हून अधिक लोक अमेरिका आणि ब्रिटनसह जगातील 15 देशांमध्ये नेतृत्वाची पदे भूषवित आहेत आणि त्यातील 60 जणांनी मंत्रिमंडळात देखील स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे.

* 60 पेक्षा जास्त भारतीय कॅबिनेटमध्ये :
सरकारी वेबसाइट्स आणि इतर सार्वजनिकरित्या उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या यादीमध्ये असे म्हटले आहे की भारतीय वंशाचे 200 हून अधिक नेते जगभरातील 15 देशांमध्ये सार्वजनिक सेवेच्या सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत आणि यापैकी 60 पेक्षा जास्त कॅबिनेट आयोजित करीत आहेत.

* भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अमेरिकेच्या उपराष्ट्रपती :
जगातील सर्वात जुन्या लोकशाहीप्रणित देशातील पहिल्या अश्वेत महिला उपराष्ट्रपती भारतीय वंशाच्या आहेत ही फार अभिमानाची बाब आहे, हे प्रत्येकजण मानेल. अमेरिकेचे खासदार अमी बेरा यांच्या म्हणण्यानुसार 2021 च्या इंडियास्पोरा गव्हर्नमेंट लीडर्सच्या यादीत माझा समावेश होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. संसदेत प्रदीर्घ काळ सेवा देणारे खासदार म्हणून मला भारतीय-अमेरिकन समुदायाचा नेता असल्याचा मला अभिमान आहे. हा समुदाय अमेरिकन जीवनाचा आणि समाजाचा अविभाज्य भाग बनला आहे.

* ‘या’ देशांमध्ये भारतीयांचे आहे वर्चस्व :
भारतीय वंशाच्या लोकांनी जगातील बर्‍याच मोठ्या देशांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि सिंगापूर यांचा समावेश आहे. या देशांमधील मंत्रिमंडळासहित भारतीय वंशाचे लोक बँकिंग, उद्योग आणि राजकारणात आपले स्थान टिकवून आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.