नवी दिल्ली – भारताचा डब्ल्युडब्ल्युइ कुस्ती स्पर्धेतील कुस्तीपटू ग्रेट खली याने सोशल मीडियावर क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला.
त्यावर चाहत्यांनी प्रचंड लाईक्स केल्या आहेत. मात्र, खली जो खेळ खेळत आहे तो क्रिकेट आहे का, फुटबॉल असा प्रश्न पडतो. कारण खली ज्या चेंडूने क्रिकेट खेळताना दिसत आहे तो चेंडू फुटबॉलचा आहे. इतका मोठा चेंडू फटकावताना खली चक्क षटकारही मारत असल्याचेही दिसत आहे. खलीचा हा क्रिकेट-फुटबॉलचा खेळ त्याच्याच घराच्या टेरेसवर रंगला आणि सोशल मीडियावर चांगलाच गाजला आहे.