न्यूयॉर्क – अमेरिकेत हिंदु धर्माविषयी आस्था वाढत असल्याची लक्षणे दिसत असून हिंदू मंदिरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये मंदिरांच्या संख्येत तब्बल दोनशे टक्के वाढ झाल्याचे दिसून आले एका आकडेवारी प्रमाणे 2006 मध्ये अमेरिकेतील मंदिरांची संख्या फक्त 53 होती तो आकडा आता 750 पर्यंत वाढला आहे.
लॉस एंजेल्स ते न्यूयॉर्क या सर्वच पट्ट्यामध्ये मंदिरांची संख्या वाढली असून तेथे विविध धार्मिक कार्यक्रम होत असून भजन आणि इतर उत्सवाचे आवाज नेहमी ऐकू येऊ लागले आहेत. भारतात अस्तित्वात असलेल्या हिंदू धर्मातील प्रत्येक गटाचे प्रतिनिधित्व करणारे मंदिर आज अमेरिकेत अस्तित्वात आहे अमेरिकेत जी प्रसिद्ध मंदिरे आहेत त्यामध्ये अक्षर धाम स्वामीनारायण या प्रख्यात मंदिराव्यतिरिक्त भगवान शंकर गणेश विष्णू या सर्व देवतांची मंदिरे अस्तित्वात आहेत.
एका शहरातील रस्त्याचे नावच गणेश टेंपल स्ट्रीट असे देण्यात आले आहे अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याचा विचार करता किमान सरासरी पाच मंदिरे त्या राज्यात अस्तित्वात आहेत अमेरिकेच्या सर्वच राज्यात भारतीय लोक राहात असल्याने त्यांनी आपापल्या भागांमध्ये बंदी उभारण्याला प्राधान्य दिले असून त्याचाच परिणाम म्हणून अमेरिकेतील मंदिरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.