बच्चन कुटुंबाची नात आणि ऐश्वर्या-अभिषेकची कन्या आराध्या हिने अलीकडेच ऍन्युअल डेच्या शालेय कार्यक्रमामध्ये महिला सशक्तीकरणाच्या मुद्द्यावर दिलेल्या भाषणामुळे महानायक अमिताभ बच्चन चांगलेच गहिवरून गेले. लहान वयात एका महत्त्वाच्या विषयावर नातीने मांडलेले विचार ऐकून अमिताभ भलतेच खुशही झाले आहेत.
आराध्याचे हे भाषण पाहण्या-ऐकण्यासाठी स्वतः ऐश्वर्या, अभिषेक आणि अमिताभ बच्चन उपस्थित राहिले होते. आराध्याच्या या भाषणाचा व्हिडिओ जास्मीन जानी नावाच्या ट्विटर अकौंटवरून शेअर करण्यात आला आहे.
the proudest moment and voice .. of the girl child .. of Aaradhya , my own .. https://t.co/Gsa9gBIgBA
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 22, 2019
या व्हिडिओला रिट्विट करताना अमिताभ लिहितात की, परिवार का गर्व, एक लडकी का गर्व, महिलाओंका गर्व… हमारी प्यारी आराध्या..’ या भाषणात आराध्या सांगते की, मी एक मुलगी आहे. मी स्वप्न आहे… एका नव्या युगाचं स्वप्न… आपण एका नव्या जगात जाणार आहोत… एक अशी दुनिया जिथे मी सुरक्षित राहू शकेन… मला प्रेम मिळू शकेल,
माझा सन्मान केला जाईल… एक अशी दुनिया जिथे माझा आवाज अज्ञान किंवा रागाने दाबला जाणार नाही..उलट सामंजस्याने तो ऐकला जाईल… एक असे जग जिथे जीवनाच्या पुस्तकातून ज्ञान मिळेल आणि मानवतेच्या वाटेवरुन स्वतंत्रपणाने ते खुलत जाईल…’ आराध्याचे हे विचार-मांडणी ऐकून श्रोत्यांसह स्वतः अमिताभही मंत्रमुग्ध झाले.