ब्रिटनमध्ये अन्नधान्य, इंधनाची मोठी टंचाई

ट्रकचालकांच्या कमतरतेमुळे अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली
लंडन :
ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसापासून अन्नधान्य आणि इंधनाची मोठ्या प्रमाणावर टंचाई भासू लागले आहे.  देशातील ट्रक चालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने त्याचा मोठा फटका वाहतुकीला आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला बसला असून त्यामुळेच ही टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ब्रिटनमधील अनेक सुपर मार्केट मधील सामानाची रॅक आता रिकामी झाली असून देशातील अनेक ठिकाणचे पेट्रोल पंपही बंद झाले आहेत. ब्रिटनमध्ये सध्या 1 लाख ट्रक चालकांची कमतरता असून ही कमतरता भरून काढण्याचे काम आता लष्कराच्या जवानांवर देण्यात आले आहे. हे जवानच आता देशभर खाण्यापिण्याचे सामान इंधन आणि इतर अत्यावश्यक वस्तू पुरवण्याचे काम करणार आहेत.

देशात ब्रेक्झिटचा निर्णय झाल्यानंतर ब्रिटनमध्ये काम करणारे युरोपमधील अनेक देशांमधील ट्रक चालक आपापल्या देशांमध्ये निघून गेले त्याचा मोठा फटका सध्या इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. महामारी च्या काळामध्ये ही हजारो ट्रक चालक बाधित झाल्याने ट्रक वाहतुकीची अर्थव्यवस्था ही संपूर्णपणे विस्कळीत झाली होती.

ब्रिटनमधल्या अनेक कंपन्या ट्रक चालकांना वार्षिक 70 ते 80 लाख रुपये पगार देण्यास तयार आहेत पण तरीसुद्धा हे ट्रकचालक काम करण्यास तयार नाहीत. वाहतुकीचे काम कायमस्वरूपी लष्कराच्या जवानांना देणे शक्य नसल्याने ब्रिटन सरकारला लवकरच ट्रक चालकांच्या भरतीबाबत महत्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.