मुंबई – राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवभोजन थाळीची व्याप्ती वाढवली आहे. याच धर्तीवर पुणे जिल्हा परिषदेनं ‘शरज भोजन योजने’ची सुरूवात केली आहे. निराधार दिव्यांग, वृद्ध नागरिक आणि निराधार दुर्धर आजारग्रस्तांसाठी ही योजना असल्याचं सांगण्यात आले आहे. यावरुन आता भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी महाविकासआघाडीवर टीका केली आहे.
शरद भोजन योजनेचा फोटो ट्विट करत नितेश राणे म्हणाले कि, छान… पण… राज्यात महाविकास आघाडीची शिवभोजन योजना सगळीकडे सुरु आहे. मग..जनतेत संभ्रम नको म्हणून विचारल.. असं म्हणत महाविकास आघाडीला त्यांनी टोला मारला आहे.
छान 👍🏻👍🏻👍🏻
पण…
🤔🤔🤔 pic.twitter.com/k1rIHyHfqF— nitesh rane (@NiteshNRane) April 12, 2020
पण..
राज्यात महा विकास आघाडी ची शिव भोजन योजना सगळी कडे सुरु आहे..
मग..जनतेत संभ्रम नको म्हणून विचारल..
😊😊😊— nitesh rane (@NiteshNRane) April 12, 2020
दरम्यान, लॉकडाऊनमुळे निराधार दिव्यांग, निराधार वृद्ध नागरिक, गरोदर महिला, दुर्धर आजाराने बाधित असलेल्या निराधार व्यक्ती यांचे भोजनाची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे जिल्हा परिषदेमार्फत अशा व्यक्तींकरिता शरद भोजन योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेचा लाभ दिव्यांनाही मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिली.