ग्रेट पुस्तक : सेकंड लेडी

अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार

वास्तव नेहमीच कल्पनेपेक्षा वेगळे असते. याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. अगदी एकसारखी दिसणारी असंख्य लोकं आपण पाहू शकतो किंवा तशी व्यक्ति क्‍लोनिंगच्या जमान्यात सहजच निर्माण करता येईल, इतकी प्रगती विज्ञानाने केली आहे. “सेकंड लेडी’ हे पुस्तकं तशाच विलक्षण गोष्टीला समोर ठेऊन पुस्तकं लिहले गेले आहे. याचा मराठी अनुवाद रवींद्र गुजर यांनी केला असून आयर्विंग वॅलेस हे मूळ लेखक आहेत.

अमेरिका आणि रशिया संबंध खूप ताणले गेल्यामुळे रशियाला आपली हार निश्‍चित दिसत होती. अमेरिकेच्या अध्यक्षांची पत्नी बिली अमेरिकेची “फर्स्ट लेडी म्हणून बहुमान मिळवत असते. त्याच बरोबर ती अनेक देशांना भेटून स्वतःची ओळख निर्माण करते, ज्याचा फायदा राष्ट्राअध्यक्षाना पुढील निवडणुकीमधे होणार असतो. याच कारणाने ती रशियाला जायला निघते.

तिच्यासोबत तिचे आत्मचरित्र लिहणारा लेखक अन तिची सेक्रेटरी नोरा जातात परत येताना ते बिलीसारखी दिसणारी कोणी तरी “सेकंड लेडी’ घेऊन येत आहेत, याची त्यांना पुसटशी कल्पनासुद्धा नसते.

इकडे खरी “फर्स्ट लेडी’ रशियाच्या ताब्यात असते तिच्यावर लक्ष ठेवणारा गुप्तहेर अँलेक्‍स हवी ती माहिती “सेकंड लेडी’ला पुरवत असतो. तिच्यावर कोणालाही संशय येऊ शकणार नाही इतकी योजनाबद्ध तयारी असते. अगदी तिचे पती, आई वडील भाऊ बहिणीसुद्धा तिला ओळखू शकत नाहीत. तरी तिचा लेखक अन सेक्रेटरी यांना तिचा संशय येऊन शोध सुरु होतो.

रशियाचे हेर खाते “सेकंड लेडी’कडून माहिती मिळाली की तिला नाहीसे करण्याचा कट करते. पण तिला या गोष्टीचा सुगावा लागताच त्यात पुन्हा बदल होऊन “फर्स्ट लेडी’ला मारण्याचा प्लॅन आखला जातो..

पीटर तिचा लेखक प्राणपणाला लावून त्याची प्रिय मैत्रिण बिली हिला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी तो रशियात कैद बिलीजवळ असलेला अँलेक्‍स जो “सेकंड लेडी’ व्होराचा प्रियकर याच्याशी संपर्क करतो. एकीकडे प्रेयसी, देशभक्ती, अन्‌ कैदेत असलेली बिली हिच्याबद्दल निर्माण झालेली जवळीक या तिन्ही गोष्टीतून तो कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतो? त्यात तो यशस्वी होतो का? बिली अन व्होरा पैकी कोणाला तो वाचवू शकतो? असा शेवट खूपच गुंतागुंतीचा आहे. शेवटपर्यंत प्रचंड उत्सुकता ताणली जाते. शेवट धक्कादायक आहे. पुस्तकं छान आहे नक्की वाचा.

– मनिषा संदीप

Leave A Reply

Your email address will not be published.