ग्रेट पुस्तक : परिवार संवाद

अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार…

मित्र मैत्रिणींनो, परिवार म्हटले की प्रत्येकजण हळवा होत असतो भले तो छोटा असो मोठा असो ज्याचा त्याला प्रियचं.. मूकप्राण्यांचा परिवार, असो की तुमच्या आमच्या सामान्यांचा असो प्रेम सगळ्यांचे सारखे, पण तरीही अनेक कुटुंबात कलह पाहायला मिळतो.. प्रेम असूनही विचार जुळत नाहीत मग नकळत एकमेकांबद्दल राग निर्माण व्हायला लागतो अन्‌ खोट्या अहंभावामधे परिवार विभक्त होतात… कुठेतरी ती दरी वाढतच जाते अन्‌ मग कधी कधी हा दुरावा जीवघेणा ही ठरतो.. आणि हे टाळण्यासाठी थोडी फार तरी विचार परिवर्तन व्हावे म्हणून कदाचित हे पुस्तकं असावे… पुस्तकाचे नाव आहे “परिवार संवाद’ लेखिका आहेत इंदुमती काटदरे.. का होत असेल असे परिवारांचे विभाजन? प्रेम असूनसुद्धा केवळ संवाद नसल्यामुळे.. पुस्तकाचा विषय अगदी रोजच्या जीवनातील आहे, पण खूप खोलवर विचार करण्यास भाग पाडतो.. घर म्हटले की भांड्याला भांडी लागणारच, असे वाक्‍य सहज ऐकायला मिळते.. पण खरंच घर म्हटले की हे व्हायलाच हवे का?.. निव्वळ थोड्या प्रमाणात ठीक आहे एक वेळ.. पण त्यातून निर्माण होणारी सुडाची भावना कितपत योग्य आहे.

कसे समजून घ्यावे सगळ्यांना, यासाठी हे पुस्तक खरंच खूप उपयोगी आहे.. हे झाले मोठ्यांचे पण आपल्या आणि मुलांमध्येसुद्धा काही वेळा संवाद नसल्यामुळे म्हणा किंव्हा त्याला काही कळत नाही, लहान आहे अजून म्हणून आपण बरेच वेळा टाळतो, पण त्याचा परिणाम मुलांवर काय होतो नकळतपणे, आपल्या लक्षात ही येत नाही अन्‌ एखाद्या वेळी सगळ्यांसमोर ते मूल असे काही बोलून जाते की आपल्याला लाजिरवाणे वाटते मग पुन्हा त्याच्याशी न संवाद साधता मारणे अन्‌ रागावणे, हे का होतेय तर फक्त संवाद नसल्यामुळे… आपणच त्यांच्यासमोर असे काही वर्तन नकळत करत असतो की त्याचा परिणाम त्यांच्या कोवळ्या मनावर होतो.. कोणतेही नाते संवादाशिवाय फुलत नाही हेच खरे.. या पुस्तकातील सगळी उदाहरणे थोड्याफार प्रमाणात गोष्टी रूपात लिहली आहेत त्यामुळे हे वाचायला खूप छान वाटते.. कथांमधून मिळणारा बोध अन्‌ रोजच्या जीवनातील प्रसंग यामुळे आपल्याला हे लिखाण पटते म्हणा किंवा आपल्या चुका लक्षात येत जातात.

आंब्याचे तोरण, हे आपले बोलणे, पशुतेला कुरवाळणे, आपण कसे आहोत, माझे तर कोणीच ऐकत नाही विक्राळ, दांडगट आणि राजकन्या या आणि अश्‍या तब्बल एकोणचाळीस कथा आहेत… एकापेक्षा एक छान अन्‌ विचार करण्यास भाग पडणाऱ्या.. हे पुस्तक वाचून नक्कीच स्वतःमध्ये होणारा बदल जाणवत राहील… खात्री आहे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल… मूळ लेखिका गुजराती आहेत याचा मराठी अनुवाद विनय पत्राळे यांनी केला असून याचे प्रकाशक दीक्षा पब्लिकेशनचे प्रकाश कुलकर्णी आहेत.. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना उपयोगी व आवडेल असे पुस्तक आहे. नक्की वाचा, लवकरच नवीन पुस्तकासमवेत भेटेनचं धन्यवाद…

– मनीषा संदीप

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.